पुण्याच्या एचएनडी होस्टेलचा व्यवहार रद्द करा

Foto
पैठण येथे जैन समाजाचा तहसीलवर मोर्चा
पैठण (प्रतिनिधी) : पुणे येथील एच एन डी होस्टेलचा येथील मंदिर विश्वस्तांनी केलेला चुकीचा व्यवहार रद्द करण्यात यावा अशी मागणी सकल जैन समाजाच्या वतीने तहसीलदार पैठण यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एचएनडी हॉस्टेलमध्ये भारतातील जैन समाजाचे विद्यार्थी राहण्यास येत असतात परंतु तेथील मंदिर विश्वस्ताने हिराचंद नेमिचंद जैन होस्टेल विकून चुकीचा व्यवहार करून समाजाचा विश्वासघात केला. सदरील व्यवहार रद्द करण्यात यावा अशी मागणी पैठण येथील जैन समाज बांधवांनी मूक मोर्चा काढून तहसीलदार यांना 
दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

या निवेदनावर विलास पहाडे महामंत्री जैन मंदिर पैठण, विजय पापडीवाल, सुमित गंगवाल, अभिजीत पाटणी, राहुल वर्धमान पहाडे, महेश कासलीवाल, किशोर भाकरे, महावीर पहाडे, कपिल पहाडे, दिपाली पहाडे, सारिका पहाडे, पियुष भाकरे, रोहित पहाडे, शोभा पहाडे, संगीता कासलीवाल, अभिजीत कासलीवाल, डॉक्टर कासलीवाल, विलास काला, प्रसाद भाकरे, अनिल पहाडे, डॉक्टर गौतम पहाडे, महावीर पहाडे, वर्धमान पहाडे, अशितोष कासलीवाल, आदींच्या सह्या आहेत.